आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझोनचे महत्त्व समजण्यासाठी सचिवांनी मीनाक्षी मंदिरात जावे, हरित लवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ओझोनच्या थराला पडलेले छिद्र हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, परंतु भारताला सुमारे ७०० वर्षांपासून ओझोनचे महत्त्व ज्ञान आहे. मदुराई येथे मीनाक्षी मंदिरातील भूगोल चक्रात तुम्हाला त्याचे पुरावे आढळतील. त्याचा अभ्यास करण्यासाठी वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात पाठवा आणि हे चक्र अभ्यासा, असा सल्ला राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिला आहे.

एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांनी म्हटले की, भारताला ओझोन थराचे अस्तित्व आणि महत्त्व कधीपासून ज्ञात आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? भारत पहिला देश आहे ज्याला ओझोनच्या थराचे महत्त्व समजले आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिरात ७०० वर्षे जुन्या भूगोल चक्रात त्याचे पुरावे आढळतात. त्यात ओझोनचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तसेच तो थर वाचवण्याचे उपायदेखील दिले आहेत. वन व पर्यावरण मंत्रालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे पाठवून त्याचा अभ्यास करायला हवा.

ओझोनचा थर हे एक वायूचे नैसर्गिक अावरण आहे. ते पृथ्वीवर १५ ते ३० किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. एका याचिकेत आरोप करण्यात आला होता की, अनियंत्रित उत्सर्जनामुळे भारतात सहजरीत्या उपलब्ध असलेल्या हायड्रोफ्लोरो कार्बनमुळे ओझोनच्या थराचे नुकसान होत आहे. त्यामुळे हवामान बदल होत असून त्याबाबत लवादाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला.
ओझोनचे परिणाम जागतिक समस्या
ओझोनच्या थरातील बदल आिण त्याला पडलेले छिद्र ही सध्या जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्याचा अभ्यास सध्या केला जात आहे. मीनाक्षी मंदिरात तो याआधीच झाल्याचे दिसून येते.
बातम्या आणखी आहेत...