आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅकर्सकडून दोन वर्षांत 100 बँकांना 6200 कोटींचा चुना, थेट बँकांनाच लक्ष्य करण्याचा नवा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माहिती तंत्रज्ञानामुळे दरदिवशी सेवा, सुविधांचा विस्तार होत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रकार व त्याचे धोकेही वाढत आहेत. सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार व हॅकर्सनी वेगवेगळ्या १०० बँकांमधून जवळपास ६,२०० कोटी रुपयांची चोरी केली आहे. अँटिव्हायरस तयार करणारी प्रमुख रशियन कंपनी कॅसपर्सकीने एका अहवालात ही माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व चोऱ्या गेल्या दोन वर्षांत झाल्या आहेत.
कॅसपर्सकीच्या एका अहवालात हॅकर्सकडून वापरल्या जाणा-या चोरीच्या पद्धतीचाही खुलासा केलेला आहे. त्यात म्हटले आहे की, सुरुवातीला हॅकर्स एखाद्या बँक ग्राहकाला लक्ष्य करत असत. परंतु आता त्यांनी पद्धती बदलली असून आता ते बँकेच्या एखाद्या ग्राहकाला लक्ष्य करण्याऐवजी थेट बँकेलाच टार्गेट बनवत आहेत. अशा प्रकारे बहुतांश चोऱ्या अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी व यूक्रेन आधी देशांतील बँकांमध्ये झाल्या आहेत. हॅकर्सनी ज्या बँकेला चुना लावला त्याची नावे कॅसपर्सकीने सांगितलेली नाहीत. परंतु कंपनी विविध देशांत कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी इंटरपोल, यूरोपोल व इतर एजन्सीजच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे. कंपनीने या गँगला "कारबनक' अस नाव दिले आहे.

असे काम करतात हॅकर्स
फिशिंग व दुस-या पद्धतीने हॅकर्स बँकेच्या संगणकप्रणालीपर्यंत पोहोचतात. अनेक महिने त्यावर गुप्त पद्धतीने लक्ष ठेवतात व बँकेच्या कामाची पद्धती समजून घेतात. त्यानंतर कर्मचारी ज्या कॉम्प्युटरवर कामकरतात, त्यांचे स्क्रीन शॉट व व्हिडीओ घेतात. त्याचा अभ्यास करून बँकेतील प्रत्यक्ष काम समजून घेण्यासाठी तिथे बनावट खातेही उघडतात. त्यानंतर त्यात पैसे ट्रान्सफर करतात. छोटी रक्कम असल्याने सुरुवातीला ती पकडली जात नाही. कॅसपर्सकीच्या माहितीनुसार सर्वसाधारपणे हॅकर्स कोणत्याही बँकेतून ५० ते ६० कोटींची रक्कम हडप करतात. त्यानंतर ते दुसऱ्या बँकेकडे मोर्चा वळवतात. त्यांच्याच बँकेत खाते असल्याने व कोट्यवधींची उलाढाल असल्याने ही चोरी उघड होण्यास वेळ जाताे. अशा प्रकारे हॅकर्सन आजवर शंभरावर बँकांना चुना लावला असून अपहाराची रक्कम सहा हजार कोटींच्या घरात आहे.