आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’ सकारात्मक पाऊल : मूडीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. या निर्णयामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होईल तर महागाईवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या संस्थेतर्फे वर्तवण्यात आला. विकास धिम्या गतीने होणार असून सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले वस्तू व सेवा कर विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. जीएसटी लागू केल्यानंतर विकास तर होणार आहे, परंतु यासाठी राजकीय पाठबळ असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ‘मूडीज’चे वरिष्ठ अधिकारी मारी डिरॉन म्हणाले. एखाद्या धोरणाला अधिक प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला तर सुधारणेच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करता येते. ज्या ठिकाणी वाद निर्माण होतात तेथे धिम्या गतीने विकास होत असल्याचे डिरॉन यांनी सांगितले. जीएसटी मंजूर करण्यासाठी बराच वर्षांचा कालावधी लागला, परंतु वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्याने याचा फायदा होणार असल्याचे ‘मूडीज’चे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...