आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी मंजुरीची अपेक्षा कमी : जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बिल मंजूर होण्याची अपेक्षा कमी असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. अर्थमंत्र्यांनी सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मात्र, ही बैठक िनष्फळ ठरली. हे अधिवेशनदेखील बेकार जाईल, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. खासदारांची जबाबदारी या विषयावर हवाला देताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १९५७ च्या वक्तव्याचा हवाला दिला. लाेकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खारगे दिल्लीत नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आणखी एक बैठक घेण्याचे सांगितले, ते सरकारने मान्य केले. अाता पुढील बैठकीवर सर्वांचे लक्ष आहे.ही बैठक संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या कार्यालयात झाली. या वेळी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद आणि उपनेते आनंद शर्मा यांची उपस्थिती होती. त्यानंतर यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील सहभागी झाले होते. यावर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेणार असल्याचे नायडू यांनी सांगितले. याआधीदेखील पंतप्रधान मोदी यांनी जीएसटीवर सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना बोलावून चर्चा केली होती.

काँग्रेसच्या तीन मागण्या
{ जीएसटी दराला संविधान संशोधन विधेयकात समाविष्ट करावे.
{ एक टक्का इंटर स्टेट जीएसटीची तरतूद संपवण्यात यावी.
{ विवादाचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र अर्धन्यायिक प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी.

सरकारचे उत्तर
{ बिलात जास्तीत जास्त जीएसटीचा उल्लेख केला जाऊ शकत नाही.
{ आय-जीएसटीवर महाराष्ट्र-गुजरातसारख्या उत्पादनप्रधान राज्यांशी चर्चा केली जाईल.
{ विवाद संपवण्यासाठी जीएसटी काैन्सिलमध्ये निर्णय व्हावा.
बातम्या आणखी आहेत...