आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी विधेयक उद्या राज्यसभेत, सोनियांच्या सभेमुळे एक दिवस पुढे ढकलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडले जाईल. काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांनी तशी घोषणा केलेली नाही. केंद्र सरकार मंगळवारीच हे विधेयक मांडणार होते. परंतु काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सभा आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि राज बब्बर त्या सभेला राहणार आहेत. त्यामुळे मंगळवारऐवजी बुधवारी हे विधेयक मांडले जाणार आहेे.

सुमारे एक वर्षापूर्वीच लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. काँग्रेसच्या विरोधामुळे राज्यसभेत हे विधेयक अडकले आहे. सरकारने १% आंतरराज्यीय कर संपुष्टात आणून राज्यांना ५ वर्षे नुकसान भरपाई देण्याची काँग्रेसची अट मान्य केली आहे.नव्या मसुद्यावर गुलाम नबी आझाद आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम मंगळवारी काँग्रेस खासदारांशी चर्चा करणार आहेत.

५०% उपस्थिती, दोन तृतीयांश मते आवश्यक
हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. त्याच्या मंजुरीसाठी सभागृहात किमान ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. विधेयक मंजुरीसाठी उपस्थितांपैकी दोन तृतीयांश मते आवश्यक आहेत.

भाजपचा व्हीप, तीन दिवस हजर राहा
राज्यसभेत जीएसटी विधेयक मांडण्यापूर्वी भाजपने सोमवारी आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करून तीन दिवस सभागृहात हजर रहायला सांगितले आहे. मंगळवारी भाजप संसदीय पक्षाची बैठक होईल.
बातम्या आणखी आहेत...