आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7500 रु. हॉटेल भाड्यावर 28% कर, जीएसटी परिषदेने अाधीचा निर्णय बदलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - जीएसटी लागू झाल्यानंतर ७५०० रुपयांपेक्षा जास्त हॉटेलच्या किरायावर २८ टक्के कर लागेल. रविवारी जीएसटी परिषद बैठकीत हा निर्णय झाला. आधी ५,००० व त्यापेक्षा जास्त किरायावर २८% कराचा निर्णय झाला होता. परिषदेने नफेखोरी रोखणे, अॅडव्हान्स रुलिंग, अपील व रिव्हिजन, मूल्यांकन व लेखापरीक्षणासंबंधी नियमांनाही मंजुरी दिली. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ई-वे बिलाबाबत चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
 
जीएसटी परिषदेने अाधीचा निर्णय बदलला
ग्राहकांशी निगडित निर्णय  
हॉटेल : प्रतिदिन ७५०० रु. पेक्षा जास्त किरायावर २८% कर. खोलीचे भाडे २५०० ते ७५०० रपये असल्यास १८% कर लागेल. १००० ते २४९९ रुपयांवर १२%, २५०० ते ४९९९ रुपयांवर १८% आणि त्याहून जास्त किरायावर २८% कर लागेल.
लॉटरी : राज्य सरकारकडून संचालित लॉटरीवर १२ टक्के आणि सरकारी मान्यताप्राप्त लाॅटरीवर २८  टक्के कर आकारणी केली जाणार आहे.
 
व्यापाऱ्यांशी निगडित
रिटर्न :
जुलै व ऑगस्टचे रिटर्न फाइल करण्यासाठी व्यापाऱ्यांना फक्त खरेदी-विक्रची टोटल (समरी) द्यावी लागेल. रिटर्न देण्यासाठी व्यापाऱ्यांना जास्त अवधी मिळणार आहे.
पेनॉल्टी : या महिन्यांसाठी विलंब शुल्क वा दंड लागणार नाही. सप्टेंबरपासून नियमांचे कठोर पालन होईल.
बातम्या आणखी आहेत...