आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमुळे राख्यांच्या विक्रीत 30 टक्क्यांनी घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीएसटीमुळे ऐन रक्षाबंधनातही कपड्याच्या दुकानांतील गर्दी कमी झाली होती. सुरतमध्ये एक महिन्यापासून साडी, सूट आणि लहान मुलांच्या कपड्यांचा स्टॉक शिल्लक राहिलेला नाही. तेथील संपामुळे कपड्याच्या उद्योगाला ३३ हजार कोटी रुपयांचे एकूण उलाढालीपैकी २५ टक्के नुकसान झाले आहे. राख्या महाग झाल्याने त्याची विक्रीही ३० टक्क्यांनी घटली. कारण राखीच्या साहित्यावर १२ टक्के जीएसटी लावण्यात आला. त्यामुळे राख्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले.  

भोपाळ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील अग्रवाल म्हणाले, गेल्या रक्षाबंधनाच्या महिन्यात शहरात सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. परंतु यंदा ही उलाढाल ६० कोटींवर आली आहे. राधेश्याम पटवा म्हणाले, यंदा राखीचा व्यापार ३० टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांची राख्यांच्या विक्री झाली होती. यंदा ठोक विक्रीत केवळ ८ कोटींचा व्यवसाय झाला आहे. सुरतमध्ये रक्षाबंधनाची साडी विक्री ६०० कोटींहून निम्म्यावर आली आहे. जीएसटीला स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांपुरतीच ही उलाढाल होती. 

पंजाबमध्येही ग्राहकी घटल्याने चिंता 
पंजाबमध्येही यंदा जीएसटीमुळे व्यापाऱ्यांनी साठा ठेवला नाही. व्यापाऱ्यांनी नवीन-जुना असा स्टॉक मिळून विक्रीचा प्रयत्न केला. यंदा ग्राहकांची संख्या निम्म्यावर आली आहे, असे होलसेल जनरल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुखविंदरसिंह बग्गा यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...