आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • GST Launch: Special Parliament Session Will Be Called For June 30 Midnight: Arun Jaitley

GST साठी 70 वर्षांनंतर मध्यरात्री बोलावण्यात येणार संसदेचे विशेष अधिवेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याआधी 14 आॅगस्ट 1947 रोजी मध्यरात्री संसदेचे विशेष सत्र बोलावून त्यात स्वातंत्र्याची घोषण करण्यात आली होती. (फाइल) - Divya Marathi
याआधी 14 आॅगस्ट 1947 रोजी मध्यरात्री संसदेचे विशेष सत्र बोलावून त्यात स्वातंत्र्याची घोषण करण्यात आली होती. (फाइल)
नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) लागू करण्यासाठी सरकारने 30 जून रोजी संसदेचे विशेष अधिवेशन ठेवले आहे. 30 जूनच्या रात्री सुमारे 11 वाजता हे अधिवेशन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होईल. रात्री 12 वाजताच राष्ट्रपती आणि पंतप्रधान जीएसटीला औपचारिकरीत्या देशभरात लागू करतील. अरुण जेटली यांनी मंगळवारी याची माहिती दिली. देशभरात 1 जुलैपासून GST लागू होणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा कायदा लागू करण्यासाठी मध्यरात्री संसदेचे सत्र बोलावले जाईल. याआधी 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री विशेष सत्र बोलावण्यात आले होते. 
 
30 जून रोजी होईल जीएसटी अधिकृत लागू
- जेटली म्हणाले, 30 जूनच्या रात्री अधिकृतरीत्या याला लागू करण्यात येईल. हा सोहळा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होईल. यात सर्व खासदार, सर्व राज्य सरकारांचे अर्थमंत्री आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एम्पावर्ड मीटिंगचे सदस्य राहिलेल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 
 
70 वर्षांपूर्वी अर्ध्या रात्री बोलावले होते विशेष अधिवेशन
देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री संसदेचे सत्र बोलावण्यात आले होते. तेव्हा वंदे मातरम् गाण्यात आले. अर्ध्या रात्री स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर डॉ. प्रसाद यांचे भाषण झाले. नंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी Tryst with Destiny (नियतीशी पुनर्मिलन) भाषण केले. सर्वांसमोर राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. अर्ध्या रात्रीनंतर संसद 15 ऑगस्टच्या सकाळी 10 पर्यंत स्थगित करण्यात आली. 
 
हेही जरूर वाचा
बातम्या आणखी आहेत...