आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Chief Minister Narendra Modi Greeted The Muslims

मोदींनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा; काँग्रेस नेते म्हणाले, \'मतांसाठी ते काहीही करतील\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम बांधवांना रमजान निमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज (गुरुवार) मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यानिमीत्त मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ते त्यांच्या शुभेच्छा संदेशात लिहितात, की रमजानचा पवित्र महिना आनंद, शांती आणि संपन्नता घेऊन येवो, अशी मी प्रार्थना करतो.

त्यांच्या या शुभेच्छा संदेशानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मतांसाठी ते काहीही करतील अशी प्रतिक्रीया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मोदींच्या ट्विटवर गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले, की ते मतांसाठी काहीही करू शकतात. कधी ते राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करतात तर कधी त्याला विसरूनही जातात. कधी ते जिन्नांना सेक्यूलर म्हणतात, तर कधी सच्चर कमिटीचा अहवाल जाळून टाकतात आणि रमजानच्या निमीत्ताने शुभेच्छाही देतात. मात्र जनता सगळे पाहात असते आणि तिला सगळे कळते.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेल्या नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे.
ते म्हणाले, की मोदींनी एकदा उत्तरप्रदेशातून निवडणूक लढवून दाखवावी, येथील जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. त्यांना चढलेली विजयाची नशा उत्तरप्रदेशची जनता उतरवून टाकेल. मुलायसिंह म्हणाले, की उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत गुजरातचे मॉडेल चालणार नाही.

पुढील स्लाइडमध्ये, मोदींच्या विजयासाठी फेसबुकवर 'रोजा रखो' अभियान