आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Congress MLAs To Be Expelled From The Party For Violation Of The Whip In RS Polls

क्रॉस व्होटिंग : गुजरात काँग्रेसने केले 8 आमदारांना निलंबित; 14 जणांवर होणार कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकरसिंह वाघेला 19 वर्षापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राज्यसभा निवडणूकीत भाजपला मतदान केले होते. - Divya Marathi
शंकरसिंह वाघेला 19 वर्षापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राज्यसभा निवडणूकीत भाजपला मतदान केले होते.
नवी दिल्ली- राज्यसभा निवडणूक पार पडल्यावर काँग्रेसने आपल्या 8 आमदारांना पक्षातुन निलंबित केले आहे. यात शंकरसिंह वाघेला आणि त्यांचा मुलगा महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. शंकरसिंह वाघेला यांनी यापूर्वीच पक्ष सोडला आहे. मात्र ते आमदार असल्याने तांत्रिकद्ष्टया काँग्रेसचे सदस्य होते. काँग्रेसने आपण अजुन 6 सदस्यांना पक्षातून निलंबित करणार असल्याचे म्हटले आहे. अशा रितीने एकुण 14 सदस्यांवर कारवाई होणार आहे.
 
एक दिवसापूर्वीच गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान झाले होते. काँग्रेस आमदाराच्या भूमिकेमुळे एका जागेवर चुरस निर्माण झाली होती. या जागेवर सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल हे निवडणूक जिंकले आहेत.
 
कोणाकोणाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
- गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत यांनी सांगितले की 8 आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. आणखी 6 आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे. या सर्व आमदारांनी राज्यसभा निवडणूकीत पक्षाच्या व्हिपचे पालन केले नाही. 
- गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी सांगितले की, या 8 आमदारांना 6 वर्षासाठी पक्षातुन निलंबित करण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...