आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणुकीत काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कार्यकर्ते नाराज, ठिक-ठिकाणी तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ऑस्कर फर्नांडिस यांनी तिसरी यादी जारी केली. - Divya Marathi
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ऑस्कर फर्नांडिस यांनी तिसरी यादी जारी केली.

अहमदाबाद / नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. 76 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचे जावई प्रनंजयदित्य सिंह यांचाही समावेश आहे. तिसरी यादी जाहीर होताच नाव न आलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी राडा सुरू केला आहे. अहमदाबाद येथे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वाहनांना आगीच्या हवाली केले. तर, गांधीनगर येथे निवडणूक प्रभारी अशोक गहलोत यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. ठिक-ठिकाणी काँग्रेसच्याच विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यातच दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी बनासकांठाच्या वडगाम येथून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने त्यांनाही तिकीट न दिल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

 

दिग्विजिय सिंह यांच्या जावयाला तिकीट
> काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ऑस्कर फर्नांडिस यांनी तिसरी यादी जारी केली. यात 11 उमेदवार ST आणि 3 SC आहेत. 
> यादीत दिग्विजय सिंह यांचे जावई प्रनंजयदित्य सिंह परमार यांचेही नाव आहे. त्यांना पंचमहल जिल्ह्यातील लूणावडा येथून तिकीट देण्यात आले आहे. 
> पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या 89 जागांवर मतदान होणार आहे. मध्य आणि उत्तर गुजरातच्या 93 जागांवर दुसऱ्या टप्प्यात व्होटिंग होईल. 
> तर दुसरीकडे, गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. उमेदवारांच्या यादीवरून त्या नाराज असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...