आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Governor Kamla Beniwal Transferred At Mizoram, News In Marathi

मोदी सरकारची राज्यपाल हटाव मोहिम: गुजरातच्या कमला बेनीवाल यांची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने यूपीए सरकारच्या कार्यकाळात नियुक्त करण्‍यात आलेले राज्यपाल बदलण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत आणखी एका राज्यपालची बदली करण्‍यात आली आहे. गुजरातच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांची मिझोरम येथे करण्यात आली आहे.

गुजरातच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सध्या राज्यस्थानच्या राज्यपाल मारग्रेट अल्वा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मिजोरमचे राज्यपाल पी. पुरुषोत्तम यांना नगालॅंडमध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना लोकपाल नियुक्तीवरून मोदी आणि बेनीवाल यांच्या खटके उडाले होते.

गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना लोकपाल नियुक्तीवरून बेनीवाल वादात राहिल्या होत्या. बेनीवाल येत्या नोव्हेंबर महिन्यात बेनीवाल यांच्या राज्यपालपदाची मुदत संपणार आहे. तोपर्यंत त्यांना मिझोरमच्या राज्यपालपदी राहावे लागणार आहे.
दरम्यान, यापूर्वी पाच राज्यपालालांनी राजीनामे दिले आहेत. त्यात उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी, छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त आणि नागालॅंडचे राज्यपाल अश्विनी कुमार यांचा समावेश आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालाचे एमके नारायणन् आणि गोव्याचा राज्यपाल बी.व्ही. वांछू यांची 'चॉपर डील'प्रकरणी चौकशी झाल्यानंतर त्यांनी पद त्याग केला.