आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रीला राक्षसांचा उत्सव म्हणणा-या इमामांना कोर्टातच थोबाडीत मारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : इमाम हसन

नाडियाड (गुजरात) - नवरात्र हा राक्षसांचा उत्सव असल्याचे वक्तव्य करणा-या इमाम मेहंदी हसनवर बुधवारी कोर्ट परिसरातच हल्ला झाला. सकाळी जेव्हा हसन यांना ठासरा कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी त्याठिकाणी मित्रासह उपस्थित असलेल्या राकेश पटेल नावाच्या तरुणाने इमामांच्या थोबाडीत मारली. त्याने एवढ्या जोरात थापड लगावली की, हसन त्यामुळे जमिनीवर पडले. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना अटक केली आहे.
याआधी मंगळवारी पोलिसांनी नाडियाडच्या रुस्तमपुरा भागातून अटक केले होते. त्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या रितेष सुथार यांनी एफआयआर दाखल केली होती. सुधार यांनी इमामांवर हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या तरुणाने इमामांवर हल्ला केला त्यावेळी कोर्टाबाहेर सुमारे 200 हून अधिक लोक उपस्थित होते आणि ते इमामांविरुद्ध घोषणाबाजी करत होते.
हसन यांचे वादग्रस्त वक्तव्य...
मेहंदी हसन यांनी नवरात्रींदरम्यान होणा-या गरबाच्या कार्यक्रमांसदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केली होती. नवरात्रींमध्ये आयोजित करण्यात येणा-या गरबांवर राक्षसांचा ताबा असतो. गरबा हा धार्मिक उत्सव नसून राक्षसांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. याकाळात लोक भडक कपडे परिधान करून नाचतात, असे मेहंदी हसन म्हणाले होते. गरब्याच्या कार्यक्रमात कोणतेही संत किंवा साधू नसतात असे मतही त्यांनी नोंदवले होते.
पुढील स्लाइडवर पाहा न्यायालयातील PHOTO