आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक प्रगतीचे दावे करणार्‍या गुजरातमधील शहरांमध्ये सर्वाधिक कुपोषित बालके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ अहमदाबाद - गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आर्थिक प्रगतीचे दावे करत असले तरी, राज्या सरकार ग्रामीण भागांच्या तुलनेत गुजरातमधील शहरांमध्ये कुपोषणाशी लढण्यात बरेच मागे आहे. कुपोषित मुलांची सर्वाधिक संख्या अहमदाबादमध्ये आहे तसेच शहरांच्या 50 टक्के भागात मुलभूत सुविधांचा आभाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही आकडेवारी स्वतः गुजरात सरकारने विधानसभेत दिली आहे.
आधी नरेंद्र मोदी आणि आता आनंदीबेन यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने विधानसभेच्या चालू अधिवेशना दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, कुपोषित मुलांच्या यादीत अहमदाबादचा क्रमांक पहिला आहे. येथे 43,820 बालके कुपोषणाची शिकार ठरले आहेत. तर, बडोद्यात 8,363, राजकोटमध्ये 4,867 मुले कुपोषीत आहेत. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. त्याच बरोबर शहरांचा अर्ध्या भागात मुलभूत सेवा-सुविधा, उदाहराणार्थ स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांचा आभाव आहे.
राज्य सरकारच्या कागदपत्रांच्या आधारे राज्यातील शहरी भागांमध्ये दोन टक्के बालके गंभीररित्या कुपोषित आहेत. तर, 33 टक्के मुलांमध्ये सर्वसाधारण कुपोषणाचे प्रमाण आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागात गंभीर कुपोषणाचे प्रमाण दिड टक्का आहे. तर, सर्वसाधारण कुपोषणाचे प्रमाण 25.56 टक्के आहे. ही आकडेवारी बालविकास योजना आणि अंगणवाडी केंद्रानी केलेल्या सर्वेक्षणातून उपलब्ध झाली आहे. या सर्व्हेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार शहरांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाणे वेगाने वाढत आहे. ते थांबवण्यासाठी आणि मुलांच्या विकासासाठी तत्काळ व्यापक पोषण आहार योजनेची गरज आहे.
हा अहवाल 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाला सादर करण्यात आला आहे. गुजरात हे शहरी राज्य आहे आणि येथे औद्योगिकरण वेगाने होत आहे. कुपोषणाला पाण्याचे असमान वाटप जबाबदार असल्याचा तर्क यात मांडण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, गुजरातमधील नगरपालिकांची दुरावस्था