आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका गुजराती फोटोग्राफरने पंडित नेहरू यांची काढलेली दुर्लभ छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांची आज 50 वी पुण्यतिथी आहे. नेहरू असे युग पुरुष आहेत, ज्यांनी अवघ्या विश्वाला नवीन चेतना, नवीन भावना, नवीन दिशा आणि नवीन संकल्पना दिल्या. त्यांनी अवघ्या विश्वाला प्रभावित केले. त्यांनी तब्बल सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षपद (लाहोर 1929, लखनौ 1936, फैजपूर 1937, दिल्ली 1951, हैदराबाद 1953 आणि कल्याणी 1954) भूषविले.
भारताच्या स्वातंत्र्य समराच्या वेळी देशातील पहिली फोटोजर्नलिस्ट महिला होमाई व्यारावाला यांनी नेहरू यांची काही दुर्लभ छायाचित्रे घेतली होती. मुळची गुजराती असलेल्या व्यारावाला यांचे 15 जानेवारी 2012 रोजी बडोद्यात निधन झाले. परंतु, त्यांनी काढलेली छायाचित्रे आजही अजरामर राहिली. त्यांनी ब्रिटिश हाऊस कमिशनरसोबत धूम्रपान करतानाचा नेहरू यांचा फोटो काढला होता.
असेच काही फोटो, बघा पुढील स्लाईडवर....