आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujrat Riots Not Good, But Don't Blaming On Modi Rajnath Singh

गुजरात दंगल दुर्दैवी, मोदींना दूषण देणे गैर - राजनाथ सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या जातीय दंगली दुर्दैवी असल्याचे सांगत भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दोष देणे अनुचित असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्ष धर्माच्या नावावर देशाची विभागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमच्या राज्यांपैकी गुजरात एक राज्य आहे. तेथे घडलेल्या दंगली दुर्दैवी आहेत. त्या दुर्दैवी असल्याचे कोणीही मान्यच करील. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीच या दंगली नियोजनपूर्वक घडवल्याचा ठपका ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत आहे, असे राजनाथ म्हणाले. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपच्या राजवटीत सापत्न वागणूक मिळते का, हे गुजरातमधील मुस्लिमांनाच लोकांनी विचारले पाहिजे. काँग्रेस ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोडा’ नीतीचा अवलंबत असल्याचा आरोप राजनाथ यांनी केला.


मुस्लिमांचा गैरसमज दूर करणार : नक्वी
भाजप आता मुस्लिम समाजाचा या पक्षाबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे पक्षाचे उपाध्यक्ष
मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी एक ‘व्हिजन डाक्युमेंट’ प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अल्पसंख्याकांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती हेच पक्षाचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.