आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी वडिलांसोबत विकायचे ज्यूस, ऑडिओ कॅसेट विक्रीतून उभी केली कोट्यवधींची इंडस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1951 रोजी दिल्लीतील एका पंजाबी अरोरा फॅमिलीमध्ये झाला होता. 12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गोळ्यामारुन हत्या करण्यात आली होती. त्यांचे वडील चंद्रभान दुआ दिल्लीतील दरियागंज येथे ज्यूस विक्री करत होते.
गुलशन कुमारांनी कशी सुरु केली म्यूझिक कंपनी
- लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला.
- ते 23 वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली.
- त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
- गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते.
- गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती.
- इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयांमध्ये मिळत असताना, त्याचवेळी 15 ते 18 रुपयात टी-सीरीजची कॅसेट देण्याची किमया त्यांनी केली होती.
- त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते.
- 70 च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले.
- ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले.
- बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुलशन कुमार यांची फॅमिलीतील सदस्य आता काय करतात
बातम्या आणखी आहेत...