आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुदेव टागोरांच्या कविता भरतनाट्यममधून साकारल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या अजरामर कवितांना भरतनाट्यमच्या पदन्यासातून साकारण्याचा अनोखा प्रयोग रसिकांनी राजधानीत अनुभवला.प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना गीता चंद्रन यांच्या शिष्या नबनिता मजुमदार यांनी राजधानीत हे काव्यमय नृत्याचे सादरीकरण केले.
45 वर्षीय नबनिता यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम (अरंगेतरम) होता. शनिवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्यामधील नैपुण्य आणि लालित्यपूर्ण हालचाली यांच्या जोरावर नबनिता यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कलाविष्कारातून दिव्यत्वाचा शोध अपेक्षित आहे. अभिव्यक्तीदेखील वेगळी हवी होती. हाच उद्देश असल्याने आम्ही प्रयत्न केला. टागोरांच्या काव्यातील अनेक गोष्टींना नाट्याच्या रूपात सादर करता येऊ शकते, असे लक्षात आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, असे चंद्रन यांनी सांगितले. नबनिता मूळच्या बंगाली आहेत. त्यांनी दक्षिण भारतीय कला शिकली. त्यानंतर या संस्कृतीमध्ये प्रयोग करण्याचा विचार माझ्या मनात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.