आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात गुटखा खाल्ल्याचा आरोप, अधिकाऱ्याला हटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कार्यालयात गुटखा खाणे व सिगारेट ओढण्याच्या आरोपाखाली दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दिल्ली संवाद आयोगाचे सदस्य सचिव आशिष जोशी यांना हटवले आहे. अाशिष यांनी मात्र आप समर्थकांची भरती न केल्याने कारवाई झाल्याचे म्हटले आहे. ‘गुटख्यावर बंदी आहे. मी बीअर पितो. पानबहारमध्ये तुळसीच्या पानांचे मिश्रण खातो. सिगारेटही ओढतो. पण कार्यालयाच्या बाहेर,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आयोगाचे अध्यक्ष आशिष खेतान यांनी जोशींची तक्रार केली होती.
बातम्या आणखी आहेत...