आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीही या, ईव्हीएम हॅक करून दाखवा! निवडणूक आयोगाकडून खुले आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने बुधवारी कुणीही राजकीय नेता, तज्ज्ञ, वैज्ञानिक वा टेक्निकल एक्स्पर्टने ईव्हीएममध्ये छेडछाड करून दाखवावी, असे खुले आव्हान दिले. तथापि, या आव्हानची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
 
सांगितले जाते की, मेच्या पहिल्या आठवड्यापासून १० दिवसांपर्यंत हे आव्हान स्वीकारता येईल. आयोगाने २००९ मध्येही असेच आव्हान दिले होते. तेव्हा देशातील विविध भागांतून आणलेली १०० ईव्हीएम यंत्रे विज्ञान भवनात ठेवली होती. आयोगानुसार, तेव्हाही कुणीच ईव्हीएममध्ये छेडछाड वा हॅकिंग करू शकला नव्हता.
बातम्या आणखी आहेत...