आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर दरोडेखोरांनी अ‍ॅडोबच्या 3.80 कोटी युजर्सचे पासवर्ड चोरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सायबर गुन्हेगारांनी 3 कोटी 80 लाख युजर्सचे पासवर्ड चोरले असल्याची कबुली फोटोशॉप आणि अ‍ॅक्रोबॅट या प्रसिद्ध सॉफ्टवेअरची विक्री करणा-या अमेरिकेतील अ‍ॅडोब सिस्टिम्सने दिली आहे. सायबर गुन्हेगारीला बळी पडलेल्या सर्व युजर्सना कळवण्यात आले असून त्यांचा पासवर्ड रिसेट केला असल्याचेही कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेल्या कंपनीने म्हटले आहे.

3 ऑक्टोबर रोजी सायबर दरोडेखोरांनी अ‍ॅडोबवर दोन हल्ले केले होते. त्यात त्यांनी 2.9 दशलक्ष ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरला. हल्लेखोरांनी अ‍ॅडोबच्या अनेक उत्पादनांचे सोर्स कोड आणि ग्राहकांची माहिती बेकायदेशीररीत्या हस्तगत केल्याचे अ‍ॅडोबच्या सुरक्षा पथकाच्या निदर्शनास आले होते. पासवर्ड चोरी गेलेल्या सर्व ग्राहकांना ई मेलद्वारे सूचना देण्यात आली आहे. सर्व अ‍ॅडोब आयडींचे पासवर्ड रिसेट करण्यात आले आहेत. अ‍ॅडोबचे सॉफ्टवेअर चित्रपट आणि व्हिडिओ निर्माते, वेब ग्राफिक्स डिझायनर्स, व्यावसायिक प्रकाशक, उद्योगधंदे आणि सर्जनशील व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वापरतात.

34 देशांमध्ये कार्यालये
आशियासह जगातील 34 देशांमध्ये अ‍ॅडोबची कार्यालये आहेत. भारतात अ‍ॅडोबचे बंगळुरू आणि नोएडामध्ये संशोधन आणि विकास कार्यालय तर मुंबई, बंगळुरू आणि नोएडामध्ये विक्री कार्यालये आहेत. भारतात अ‍ॅडोबचे 2000 हून अधिक कर्मचारी आहेत.