आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित लेखक इलैय्या म्हणाले- पटेल PM असते तर PAK सारखा असता भारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक आणि कार्यकर्ते कांचा इलैय्या - फाइल फोटो - Divya Marathi
लेखक आणि कार्यकर्ते कांचा इलैय्या - फाइल फोटो
नवी दिल्ली - दलित लेखक आणि अॅक्टिव्हिस्ट कांचा इलैय्या यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रविवारी एका कार्यक्रमात इलैय्या म्हणाले, 'देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंऐवजी पटेल झाले असते तर भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती आणि देश रसातळाला गेला असता.'

रविवारी काय म्हणाले इलैय्या
>> दिल्लीत आयोजित 'टाइम्स लिटफेस्ट'मध्ये इलैय्या म्हणाले, सरदार पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती आणि आमची लोकशाही संपली असती.
>> '2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी पटेलांचा वारंवार उल्लेख केला त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त बोलले जाऊ लागले. मोदी म्हणाले होते की जर पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचे चित्र काही वेगळे असते. पटेलांना जरा जास्तच महत्त्व देण्यात आले.'
>> 'गांधी गायीच्या पुजेचे समर्थक होते आणि त्यांना ते संविधानातही सहभागी करुन घ्यायचे होते. मात्र, ते स्वतः बकरीचे दूध पित होते. गंभीर बाब म्हणजे त्यांनी बकरीच्या रक्षणाचा कधीही उल्लेख केला नाही.'
>> 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी घेतले जाते.'

सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, पटेल वर्तमानात फारसे उपयोगी नाही
याच लिटफेस्टमध्ये पूर्वाश्रमीचे भाजप नेते सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनीही पटेलांबाबत वक्तव्य केले.

>> सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, 'पटेल वर्तमानात फार उपयोगाचे नाहीत. वास्तविक आम्हाला पोलादी पुरुषाऐवजी अशा व्यक्तीची गरज आहे जो सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल.'

>> 'सरकार आणि संघ परिवाराचा नेहरुंना बदनाम करण्याचा कार्यक्रम यशस्वी होणार नाही. भारताला पारतंत्र्यांतून बाहेर काढणे आणि आधुनिक भारताच्या निर्माणात असलेली त्यांची भूमिका कधीही नाकारता येणार नाही.'
पुढील स्लाइडमध्ये, कोण आहेत इलैय्या