आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafeez Saeed Seeks Final Jihad Against India Pakistan Punjab Assembly

हजारो लोकांसमोर पुन्हा \'बरळला\' हाफीज सईद, म्हणाला अंतिम जिहाद ची वेळ आली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याने पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानात हजारो लोकांच्या उपस्थितीत एका सभेमध्ये त्याने भारताविरुद्ध जिहाद पुकारण्याचे आव्हान केले.
इस्लामाबादच्या आबपारा चौकात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मुख्यालयापासून अगदी जवळ असणा-या या सभेत हाफीज जेव्हा अशी वक्तव्ये करत होता, त्यावेळी आयएसआयचे माजी प्रमुख हामीद गुलही त्याच्याबरोबर उपस्थित होते.
दुसरीकडे पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होण्याबाबत वक्तव्य करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर पंजाब प्रांताच्या असेंबलीमध्ये चांगलाच गोंधळ झाला आहे. तेथे मोदींच्या विरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारताच्या विरोधात आग ओकणारा सईद म्हणाला की, 'भारताच्या ताब्यात असणारा काश्मीर मिळवण्यासाठी अंतिम जिहाद छेडण्याची वेळ आली आहे. तुम्ही काश्मीरी भाऊ बहिणींची मदत करण्यासाठी तयार आहात का? या कामात तुम्ही माझी मदत कराल का?', सईदच्या या आव्हानाला तेथे उपस्थित असणा-या 10 हजार लोकांनीही प्रतिसाग दिला. 'कदम बढ़ाओ हाफिज सईद, हम तुम्‍हारे साथ है', अशा शब्दांत लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.

पुढे वाचा : शरीफ सरकारला सईदचा इशारा