आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईद बरळला, \'कयामत\'पर्यंत सिद्ध होणार नाही 26/11 तील सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद- मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड व 'जमात-उद- दवा'चा म्होरक्या हाफिज सईदने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौर्‍यावर टिप्पणी केली आहे. हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. मुंबई हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत भारताला या हल्लात माझा सहभाग असल्याचे सिद्ध करता आले नाही आणि 'कयामत'पर्यंतही भारत ते सिद्धही करु शकणार नाही, असे हाफीज सईद म्हणाला आहे.

हाफिज काय म्हणाला?
- हाफिज सईद पाकिस्तानातील एका सभेत बोलत होता. हाफीज सईदने भारताविरोधात ओकलेली गरळ व्हिडिओ स्वरुपात 'ट्विटर' प्रसिद्ध केला आहे. हाफिज म्हणाला, ‘सुषमा यांनी पाकिस्तानच्या नेत्यांनी तर काहीच म्हटले नाही. परंतु मी भारताला हे सांगू इच्छीतो की, मुंबई हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.आतापर्यंत भारताला या हल्लात माझा सहभाग असल्याचे सिद्ध करता आले नाही. 'कयामत'पर्यंतही भारत ते सिद्ध करु शकणार नाही.'

- 'भारत आतापर्यंत मुंबई हल्ल्याचे पुरावे देण्यात अयशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: 1971 मधील भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हटले होते.

- हाफिज सईद म्हणाला- भारताला युद्ध करायचे आहे...
हाफिजने आतापर्यंत अनेकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. भारताला पाकविरुद्ध युद्ध करायचे आहे. पाकिस्तानला भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्‍तान जेव्हा प्रत्युत्तर देईल तेव्हा भारत गुढघे टेकावे लागतील.

- भारत काश्मीरच्या मुद्द्याला प्राधान्य देत आहे. गोळीबार करून भारताने अप्रत्यक्षपणे युद्धाची घोषणा केली आहे.
दरम्यान, हाफिज सईदने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. सुषमा स्वराज नुकत्याच पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन आल्या आहेत, यावर भारताची काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, हाफीज सईदने 'ट्विटर'वर अपलोड केलेला व्हिडिओ...