आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखवर केलेली टिप्पणी भाजप नेत्याने घेतली मागे, म्हटले होते- देशद्रोही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात धार्मिक असहिष्णुतेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शहारुख खानने देशात असहिष्णुता वाढत असल्याचे म्हटले आहे. आता या मुद्द्यावर मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने खोचक टिप्पणी केली आहे. शाहरुखला भारतात काही अडचणी असतील तर त्याने पाकिस्तानात स्थलांतरित व्हावे, असा सल्लाही सईदने दिला आहे.

दरम्यान, देशात दिवसेंदिवस असहिष्णुता वाढत असल्याचे शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. त्यानंतर भाजपने शाहरूखवर निशाणा साधला होता. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शाहरुखला देशद्रोही असल्याचे म्हटले होते. शाहरुखचे सिनेमा भारतात कोट्यवधी रुपये कमावतात व त्याला भारतात असहिष्णुता दिसत असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले. विजयवर्गीय यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी त्यांचे वक्तव्य परत घेतले आहे.

सईदने 'टि्वटर'वर लिहिले की, 'क्रीडा, कला व संस्कृती' क्षेत्रात काम करणार्‍या भारतीय मुसलमानांना भारतात अस्तित्त्वाची लढाई करावी लागत आहे. प्रत्येक मुसलमान व्यक्तीला भारतात सावत्र वागणूक मिळत आहे. याला प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान देखील अपवाद नाही. शाहरुखला देखील भारतात राहाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे जर शाहरुखला भारतात राहाण्यास काही अडचणी येत असतील तर त्याने पाकिस्तानात येऊन राहावे.''

काय म्हणाला होता शाहरुख:
शाहरुख खानने नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. देशात निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणावर शाहरुखने चिंता व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर त्याने देशातील असहिष्णुतेबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. देशातील असहिष्णुता वाढत आहे. लोक कुठलाही विचार न करता आपले मत प्रगट करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे.

गरज पडल्यास आपणही आपला पुरस्कार परत करणार असल्याचे शाहरुखने वाढदिवसानिमित्त आयोजित ट्विटर टाऊनहॉलमध्ये चाहत्यांच्या एका प्रश्नांला उत्तर देताना म्हटले होते. देशातील असहिष्णुता अधिकच वाढल्यास आपणही आपले पुरस्कार परत करू असा इशारा शाहरुख दिला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, दहशतवादी हाफिज सईदने केलेले ‍'ट्‍वीट'