आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafiz Saeed Is A Pakistan Citizen And Free To Roam

पाक सैनिकांबरोबर भारताच्या सीमेवर फिरणा-या सईदची पाक उच्चायुक्तांकडून पाठराखण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गावात फेरफटका मारताना हाफीज सईद.
नवी दिल्ली - सईद हाफीज हा पाकिस्तानी नागरिक आहे. तसेच त्याच्याविरोधात पाकिस्तानातील न्यायालयात कोणताही खटला सुरू नाही. त्याची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तानात कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याचे सांगत भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत याने सईदच्या भारतीय सीमेवर फेरफटका मारण्याची पाठराखण केली आहे.
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद याच्या विरोधात पाकिस्तानात एकही खटला सरू नसल्याचे भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या न्यायालयातून सईदची निर्दोष मुक्तता झाले असल्याचा दावाही बासीत यांनी केला आहे.

भारत-पाकिस्तान आर्थिक विकास या विषयावर असोचॅमने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बासीत बोलत होते. त्यावेळी एका चर्चासत्रात सईद याच्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना बासीत यांनी हा खुलासा केला आहे. भारताच्या सीमेजवळ पाकिस्तानी सैनिकांबरोबर हाफीज सईद फिरताना आढळला होता. त्यासंदर्भात पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सध्या, सईदच्या विरोधात पाकिस्तानात कोणताही खटला सुरू नसल्याचे म्हटले होते. सुरुवातीला बासीत यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर बासीत यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.
पुढील स्लाइडवर वाचा, मोदी शरीफ यांची भेट नियोजित नाही...