आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाला - 'फँटम' भारताचे षडयंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानची दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नुकताच रिलिज झालेला हिंदी चित्रपट 'फँटम'वरुन हाफिजने मोदींवर निशाणा साधला. हा चित्रपट म्हणजे मोदींच्या पाकिस्तानविरोधी धोरणाचा एक भाग आहे. त्यातून मला (हाफिजला) बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.
काय म्हणाला दहशतवाद्यांचा प्रमुख
पाकिस्तानी टीव्ही चॅनल 'एआरवाय'सोबतच्या चर्चेत हाफिज सईद म्हणाला, 'मोदींनी पाकिस्तानविरोधात जे धोरण आखले आहे, हा चित्रपट त्याच धोरणाचा एक भाग आहे.' तो म्हणाला भारतीय चित्रपटांतून आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
भारताने अनेक डोजियर दिले
भारताने हाफिज सईद संदर्भात पाकिस्तानला अनेक डोजियर दिले आहेत. मात्र पाकिस्तानने सईदवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सईद विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, अशीच री पाकिस्तानने दरवेळी ओढली आहे.
नवेद आणि सज्जादने ही घेतले होते नाव
उधमपूरमध्ये नुकताच पकडण्यात आलेला दहशतवादी नवेदने चौकशीत हाफिजच्या मुलाचे नाव घेत होते. ताल्हा हाफिज सईदने प्रशिक्षण दिल्याचे नवेदने सांगितले होते. हाफिज सईद देखील अनेकवेळा ट्रेनिंग कँम्पमध्ये आल्याचे त्याने सांगितले होते. नवेदच्या अटकेनंतर भारतीय जवानांनी जावेद उर्फ सज्जाद या दहशतवाद्याला अटक केले. त्यानेही नवेद प्रमाणेच हाफिज ट्रेनिंग कँम्पवर अनेकवेळा आल्याचे सांगितले. तो भारताविरोधात चिथावणीखोर भाषण करुन मुलांना भडकवतो असे तो म्हणाला होता.