आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafiz Saeed Wades Into Shiv Sena MP\'s Force Fasting Muslim Employee To Eat Chapati Incident

रोजेदाराच्या तोंडात चपाती कोंबण्याविरोधात बरळला सईद, म्हणाला मुस्लीमांनो एकत्र या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - शिवसेनेच्या खासदारांकडून एका मुस्लीम व्यक्तीला बळजबरी चपाती खाऊ घालण्याच्या प्रकरणात आता मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद उतरला आहे. सईदने या घटनेला मुस्लीम तत्त्वांवरील हल्ला असे संबोधले आहे. तर भारतीय मुस्लीम जनतेला या दडपशाहीविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे. दुसरीकडे, ज्या 11 खासदारांनी या मुस्लीम खानसाम्याशी असभ्य वर्तन केले आहे त्यांच्यातील अनेकांवर गुन्हेगारीचे खटले चालू आहेत. या घटनेच्या व्हिडीओमध्ये खानसामा अरशदच्या तोंडात चपाती कोंबताना दिसणारे राजन विचारे यांच्याच विरोधात एकूण 13 प्रकरणे आहेत.

हाफिज सईदने मारली या प्रकरणात उडी
बुधवारी या प्रकरणी वाद पेटल्यानंतर दहशतवादी हाफिज सईदने हॅशटॅग ForcedToBreakFast या नावाने पाच ट्वीट केले. यामध्ये तो म्हणाला की, मी या प्रकरणी भारत सरकारची निंदा करतो. शिवसेना खासदारांचे हे कृत्य मानवतावादाविरोधात तर आहेच, मात्र हा थेट मुस्लीम मुल्ल्यांवर हल्लाच आहे. मोदींच्या राज्यात अशा प्रकारच्या घटना घडतात ही आश्चर्याची बाब आहे. भारताच्या याच वागण्याने पाकिस्तान बनला. मुस्लीमांविरोधातील अशी कृ्त्ये म्हणजे मुजफ्फरनगर आणि गुजरातच्या पुढचे पाऊल आहे. धर्मनिरपेक्ष भारत हा केवळ भ्रम आहे. दोन देशांचा जो सिध्दांत मांडला जातो तोच सत्य आहे. भारतातील मुस्लीमांनी या दडपशाही विरोधात आवाज उठवत एकत्र येऊन लढावे.
शिवसेना खासदारांनी केले वादग्रस्त वक्तव्य
या प्रकरणी सेेनेच्या 11 खासदारांमधील एक आनंदराव अडसूळांनी वादग्रस्त वक्तव्य करत या घटनेला गोध्रा हत्याकांडाशी जोडले. ते म्हणाले की, ही घटना ग्रोध्रा प्रमाणेच आहे. प्रत्येक जण गोध्राला विसरला आहे. मात्र त्यानंतर काय झाले, हे सुध्दा सर्वांना माहित आहे. येथेही नेमके काय झाले हे कोणालाच माहिती नाही?
पुढील स्लाईडमध्ये पाहा... या घटनेचा व्हिडिओ....