आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीकानेरमध्ये छोट्या दुकानाने सुरुवात, अमेरिकेपर्यंत पोहोचले हल्दीराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेस्लेच्या मॅगी नुडल्सवर देशात बंदी आल्यानंतर हल्दीराम कंपनीचे स्नॅक्स संशयाच्या भोवऱ्यात अडकले. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच हल्दीरामच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्यांच्या उत्पादनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कशी झाली सुरुवात
जगभर निर्यात होत असलेल्या हल्दीरामची सुरुवात 1937 मध्ये राजस्थानमधील बीकानेर या छोट्या शहरतून झाली. बीकानेरमध्ये गंगाबिशनजी अग्रवाल यांनी एक छोटे नमकीन पदार्थांचे दुकान सुरु केले. त्यानंतर ते हल्दीराम अग्रवाल नावाने प्रसिद्ध झाले. हळु-हळु हल्दीरामने गती घेतली आणि 1982 मध्ये प्रथमच देशाची राजधानी दिल्लीत पहिले दुकान सुरु झाले. त्यानंतर जवळपास एका दशकानंतर हल्दीराने अमेरिकेत निर्यात करण्यास सुरुवात केली.
अमेरिकेत घातली हल्दीरामवर बंदी
अमेरिकेच्या एफडीएने हल्दीरामच्या बंदी पाकिटातील पदार्थांमध्ये किटकनाशके आणि आरोग्याला हानिकारक घटक असल्याचे सांगत बंदी घातली. गेल्या आठवड्यात हल्दीरामचे वरिष्ठ उपाध्यक्ष ए.के.त्यागी यांनी त्यांच्या पदार्थांमध्ये पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, भारत आणि अमेरिकेतील सुरक्षेच्या मानकांमध्ये अंतर आहे.
जगातील 50 देशांमध्ये निर्यात
राजस्थानमधील छोट्या शहरातून सुरु झालेले हल्दीराम आज जगातील 50 देशांमध्ये भारतीय पदार्थांची निर्यात करतात. परदेशातील अनेक सुपर मार्केटमध्ये त्यांचे पदार्थ विक्रीसाठी आहेत.
भारतात अनेक शहरांमध्ये रेस्तराँ
भारतात हल्दीरामने अनेक रेस्तराँ देखील सुरु केले आहेत. कंपनीच्या माहितीनूसार या रेस्तराँमध्ये दरवर्षी 3.8 बिलिअन लिटर दूध, 80 मिलिअन किलोग्राम बटर, 62 मिलिअन किलोग्राम बटाटे आणि 60 मिलिअन किलोग्राम शुद्ध तूप लागते. कंपनीचे 30 पदार्थ आहेत.
त्यातील आलू भुजिया सर्वाधिक लोकप्रिय आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महाराष्ट्र सरकारने दिलेला चौकशीचा आदेश आणि हल्दीरामचे हॉटेल