आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half Girlfriend Author Chetan Bhagats New Book Is A Love Story

प्रकाशित होण्याआधीच \'हिट\' झाली चेतन भगत यांची \'हाफ गर्लफ्रेंड\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लेखक चेतन भगत यांची 'हाफ गर्लफ्रेंड' ही कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वीच 'हिट' झाली आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही आगामी कादंबरी बिहारी मुलाची प्रेमकथा आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ही नवी कादंबरी प्रकाशित होत आहे. भगत यांची कादंबरी बेस्टसेलर ठरेल, असे बोलले जात असताना 'टि्‍वटर'वर मात्र |हाफ गर्लफ्रेंड'वर टिंगल उडवली जात आहे.

दरम्यान, 'हाफ गर्लफ्रेंड' ही कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वीच बेस्टसेलर ठरत आहे. 'फ्लिपकार्ट'वर 149 रुपयांत या कादंबरीचे प्रीबुकिंग सुरू झाले आहे. या पुस्तकाविषयी लेखक भगत यांनी ट्विटरवर पोस्टही टाकली आहे. त्यांनी ट्विटरवर पुस्तकाच्या पोस्टरसह एक व्हिडिओही टाकला असल्याने चाहत्यांची फ्लिपकार्टवर पुस्तक बुक करण्यासाठी रिघ लागली आहे.

माधव हा बिहारी युवक रिया या मॉडर्न मुलीच्या प्रेमात पडतो. या दोघांच्या नात्यावर कथानक आधारलेले आहे.

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून वाचा, Twitter वर उडवली चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड'ची टिंगल!