आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मी स्विस खाती रिकामीच,६२८ पैकी २८९ खात्यांत छदामही नाही - एसआयटीचा अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काळ्या पैशाच्या चौकशीत नवेच तथ्य समोर आले आहे. स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेने दिलेल्या यादीतील २८९ खात्यात छदामही जमा नसल्याचे एसआयटीला आढळले. स्विस बँकेकडून भारताला मिळालेल्या ६२८ जणांच्या यादीत १२२ नावे दोनवेळा लिहिण्यात आल्याचेही समोर आले.

एचएसबीसीच्या जिनेव्हा शाखेतील कर्मचा-याकडून ही यादी २००६ मध्ये मिळाली होती. फ्रान्सने जून २००१ मध्ये ती भारताला दिली. सूत्रांनुसार प्राप्तिकर खाते ३०० खातेदारांविरुद्ध खटला चालवणार आहे. या प्रकरणी एसआयटीने ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टात प्राथमिक अहवाल दिला.

कोणताच तपशील नाही
स्विस बँकेतील खाती कधी उघडली, त्यात कधी व किती देवाणघेवाण झाली, हा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे काळ्या पैसेवाल्यांविरुद्ध कारवाईत अडचण येणार आहे.