आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half Young Generation Not Liable For The Employment

यंदा पदवी घेतलेले निम्मे तरुण नोकरीसाठी अपात्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात यंदा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी जवळपास निम्मे तरुण कोणतीही नोकरी देण्यासाठी पात्र नसल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष नोकरीत कौशल्य म्हणून वापर करण्यात नापास ठरल्याचे अहवाल म्हणतो.
‘अ‍ॅस्पायरिंग माइंड्स’ या रोजगारविषयक सल्लागार कंपनीच्या सर्वेक्षणात 2013 मधील रोजगारातील नवे कल, दिशांचे विश्लेषण आहे. यंदा पदवी घेतलेले 47 टक्के तरुण इंग्रजी भाषा, आकलन कौशल्य या कसोटीवर कोणत्याही नोकरीसा योग्य नसल्याचे दिसले.
प्रमुख कारणे अशी : इंग्रजीचे तोकडे ज्ञान, कॉम्प्युटरविषयक अपु-या कौशल्यांमुळे नोक-यांत स्थान मिळत नसल्याचे चित्र आहे. शिकलेल्या संकल्पनांआधारे वित्तपुरवठा-अकाउंटिंगसारख्या क्षेत्रातील नोकरीत येणा-या समस्यांवर तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्यात 75 टक्के पदवीधर अपयशी ठरतात. तर 50 टक्के पदवीधरांना याच संकल्पनांशी निगडित प्रश्नांची धड उत्तरेही देता येत नाहीत. रोजगारक्षमतेत तरुणांपेक्षा तरुणी मात्र ब-यापैकी अग्रेसर आहेत.
पात्रतेचा आलेख घसरता
2.59 % अकाउंटिंगसारख्या क्षेत्रांतील नोक-या मिळवण्यास पात्र
15.88 % विक्रीविषयक क्षेत्रातील भार पेलण्यास पात्र
21.37 %बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग क्षेत्रासाठी पात्र
तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांत प्रत्येकी
स्त्री-पुरुष प्रमाण 100 : 109 असे आहे.