आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या मदरशातील पाण्याच्या टाकीत विष मिसळले होते, हामिद अन्सारींच्या पत्नीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी उपरराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या मदरशातील पाण्याच्या टाकीत दोन अज्ञातांनी उंदीर मारण्याचे विष टाकले होते असे विधान त्यांनी सोमवारी केले आहे. सलमा यांनी सांगितल्याप्रमाणे, मदरशातील एक मुलगा रात्री बॉटलमध्ये पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याने वॉटर टँकजवळ 2 अज्ञातांना संशयास्पद कृत्य करताना पाहिले होते. यानंतर टँकच्या शेजारीच उंदीर मारणाऱ्या टॅबलेट्स सापडल्या होत्या.
 

- सलमा अन्सारी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलाने त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या दोघांनी मुलाला जोरदार धक्का देऊन ढकलून दिले. तसेच घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनीच पाण्याच्या टाकीतून उंदीर मारणारे औषध शोधून काढले होते. 
- 15 सप्टेंबर रोजी अलीगड येथील चाचा नेहरू मदरशातील ही घटना आहे. यात जवळपास 4000 मुले शिक्षण घेऊन राहतात. हा मदरसा अल नूर चॅरिटेबल सोसायटी मार्फत चालवला जातो. सलमा अन्सारी त्याच्या चेअरपर्सन आहेत.
बातम्या आणखी आहेत...