आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hamid Ansari's 'anarchists' Remark Draws Flak From BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेला अराजकाचा अड्डा करायचेय काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी मंगळवारी प्रचंड भडकले. 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत कामकाजच होऊ शकलेले नाही. नियोजित विषयावर साधी चर्चाही सुरू होऊ शकलेली नाही. संसदेत रोज गोंधळ ठरलेला. यामुळे संतापलेल्या अन्सारी यांचा तोल सुटला. ‘नियमपुस्तिकेतील प्रत्येक नियम, शिष्टाचाराला फाटा दिला जात आहे. नियम सर्रास तोडले जात आहेत. सभागृहातील या सन्माननीय सदस्यांना राज्यसभेला अराजकाचा अड्डा करायचे असेल तर भाग निराळा..’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच हा प्रकार घडला.

अगोदरच आक्रमक असलेल्या सर्वच सदस्यांचा अन्सारी यांच्या वक्तव्याने तोल सुटला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या वक्तव्याचा निषेध करत अन्सारी यांनी ते तत्काळ माघारी घ्यावे, अशी मागणी केली. या वक्तव्यावरून काँग्रेस सदस्यही नाराज झाले. अन्सारींचे वक्तव्य राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

अन्सारींनी भावना मांडली तेव्हा..
1. भाजपचे सदस्य सभागृहात प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या हरियाणातील वादग्रस्त भूखंड व्यवहारावर सरकारला जाब विचारत होते.
2. यावर काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले. त्यांनी भाजप खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला.
3. टीडीपी सदस्य ‘आंध्र प्रदेश बचाओ.. लोकतंत्र बचाओ’, अशा घोषणा लिहिलेले टी-शर्ट घालून सभागृहात धडकले.