आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीफ कडावालाच्या हत्येचा तपास सुरू, १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी सीबीआयची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हनीफ कडावाला याच्या हत्येचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडावालाने अभिनेता संजय दत्तला एक-५६ रायफल दिली होती.
सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौड यांनी सांगितले की, ‘कडावालाच्या हत्येचा तपास सीबीआयने सुरू केला आहे.’ महाराष्ट्र सरकारच्या आग्रहानंतर सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले आहे. या प्रकरणात छोटा राजन, गुरू साटम आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोल्डन क्राउन हॉटेलचा मालक जय शेट्टीच्या हत्येचा तपासही सीबीआयतर्फे सुरू करण्यात आला आहे. त्यात छोटा राजन, हेमंत पुजारी, समीर माणिक आणि इतरांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडावालाने आणली होती स्फोटके
टायगर मेमनच्या सांगण्यावरून कडावालाने मुंबईपर्यंत स्फोटके आणली होती. ती १९९३ च्या स्फोटांत वापरली गेली. तीन अज्ञात व्यक्तींनी ७ फेब्रुवारी २००१ रोजी त्याच्या कार्यालयाजवळ त्याची हत्या केली होती. मुंबई पोलिसांना हनीफच्या हत्येत राजनचा हात असल्याची शंका आहे. या स्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. स्फोट करण्यासाठी कडावालाने संजय दत्तच्या घराच्या गॅरेजमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा लपवला होता.
संजय दत्तने केला होता कटाचा इन्कार
संजय दत्तने स्फोटामागे गुन्हेगारी कट असल्याची माहिती असल्याचा इन्कार केला होता. त्यानंतर या प्रकरणात टाडाच्या आरोपातून त्याची मुक्तताही झाली होती. पण शस्त्र अधिनियमांनुसार त्याला दोषी ठरवण्यात आले होेते.
बातम्या आणखी आहेत...