आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: वयाच्या चौथ्या वर्षीच केले गीता श्लोकांचे पठण, आज आहेत देशातील मोठे आध्यात्मिक गुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रसिध्द आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे मुळ नाव रविशंकर असे आहे. रविशंकर यांचा जन्म तमिळनाडू राज्यात १३ मे १९५६ ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वेंकट रतनम तर आईचे नाव विषलक्ष्मी होते. आदी शंकराचार्य यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव शंकर असे ठेवले. जे पुढे रविशंकर असे झाले.


शंकर सुरूवातीपासूनच आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच त्यांनी श्रीमद्भगवदगीताच्या श्लोकांचे पठण सुरू केले. लहानपणापासूनच त्यांनी ध्यानाला सुरूवात केली. त्यांचे शिष्य सांगतात की, रविशंकर यांनी भौतिकशास्त्रात (Physics) वयाच्या १७ व्या वर्षीच पदवी मिळवली होती.


सुरुवातीला रविशंकर महर्षि महेश योगी यांचे शिष्य झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना महेश योगी यांच्याकडे सोपवले होते. शंकर यांच्या हूशारीमुळे ते महेश योगी यांचे लाडके विद्यार्थी झाले. सुप्रसिध्द सतार वादक रविशंकर यांनी माझ्या नावाची किर्ती रविशंकर वापरत आहेत असा आरोप केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नावापुढे 'श्रीश्री' लावण्यास सुरूवात केली.


रविशंकर लोकांना सुदर्शन क्रिया सशुल्क शिकवतात. याबद्दल ते सांगतात की, १९८२ मध्ये कर्नाटकच्या भद्रा नदीच्या काठावर असताना मी १० दिवस मौन धरले होते. त्या दरम्यान लयबध्द श्वास घेण्याच्या क्रियेतून माझ्या मनात एक कल्पना आली व त्यांनी या क्रियेला दुसर्‍यांना शिकवण्यास सुरुवात केली.


1982 मध्य श्री श्री रविशंकर यांनी ART OF LIVING FOUNDATION ची स्थापना केली. हे फाऊंडेशन शिक्षण आणि मानवतेच्या प्रचार प्रसारासाठी सशुल्क काम करते. 1997 मध्ये ‘इंटरनेशनल असोसियेशन फार ह्यूमन व्हॅल्यू’ ची स्थापना श्रीश्री यांनी केली. याचा उद्देश जागतिक स्तरावर माणसाला एकमेकांशी जोडणार्‍या मुल्यांचा विस्तार करणे हा होता.

पुढील स्लाईडवर वाचा, श्रीश्री यांचे सुविचार जे तुमचे जीवन बदलून टाकतील....तुमच्यात बदल झालेला दिसून येईल....
फोटो सौजन्य - श्री श्री रविशंकर यांचे फेसबुक पेज