आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एयरलाइन्स स्टाफच्या वर्तनासाठी सुद्धा कठोर गाइडलाइन्स हवे, खा. रवींद्र गायकवाड यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशांसोबत एयरलाईन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कसे वर्तन करावे, याबाबत सुद्धा दिशानिर्देश जाहीर करावे. (फाईल) - Divya Marathi
नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशांसोबत एयरलाईन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कसे वर्तन करावे, याबाबत सुद्धा दिशानिर्देश जाहीर करावे. (फाईल)
नवी दिल्ली / मुंबई - नागरी उड्डयन मंत्रालयाने एयरलाईन्समध्ये प्रवाशांसोबत स्टाफने कसे वर्तन करावे याबाबत सुद्धा कठोर दिशानिर्देश जाहीर करावे. अशी मागणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली आहे. मंत्रालयाने एयरलाईन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांनी कसे वर्तन करावे याबाबत कठोर नियम जाहीर केले. त्यावर गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
जेट एयरवेजकडून महिला प्रवाश्यासोबत गैरवर्तन
विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि गैरवर्तन करण्याची प्रकरणे ताजी असताना जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यांनीच एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. एका महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असून त्या महिलेसोबत झटापट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, पीडित महिला सुप्रीम कोर्टातील माजी वकील कवलजीत सिंह भाटिया यांच्या आई आहेत. 
 
शिवसेना खासदार गायकवाड म्हणाले...
- एयरलाईन्स स्टाफसोबत वर्तनाबाबत यापूर्वीही गाईडलाईन्स होते. त्यामध्ये केवळ सुधारणा करण्यात आली आहे. ही सामान्य प्रक्रिया आहे.
- नागरी उड्डयन मंत्रालयाने प्रवाशांसोबत एयरलाईन्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कसे वर्तन करावे, याबाबत सुद्धा दिशानिर्देश जाहीर करावे.
- एयरलाईन्स कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांनी गैरवर्तन केल्यास प्रवाश्यांना दंडांची तरतूद केली. तशाच प्रकारचे दंड आणि कारवाई प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा हवी.
 
 
बातम्या आणखी आहेत...