आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरॉल्ड प्रकरणी राहुल, सोनिया गांधी यांना न्यायालयाचा दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सर्व आरोपींना थोडा दिलासा मिळताना दिसत आहे. न्यायालयाने मंगळवारी सुनावणीला हजर राहण्यात सूट देताना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण १९ डिसेंबरपर्यंत शांत होईल असे वाटत होते, पण त्यावरून राजकारण चांगलेच तापले व संसदेचे कामकाजही ठप्प झाले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीमुळे मंगळवारी संसदेचे कामकाज झाले नाही. सूडभावनेतून कारवाई थांबवा, द्वेषाचे राजकारण बंद करा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यामुळे राज्यसभा ५, तर लोकसभा तीन वेळा तहकूब करावी लागली.

‘मी इंदिरा गांधींची सून’
सोनिया गांधींनी या प्रकरणी थेट टिप्पणी केली नाही. परंतु मी इंदिरा गांधींची सून आहे आणि कोणालाही घाबरत नाही, असे सांगून त्यांनी भविष्यातील आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे.