आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harsh Vardhan Is BJP's Chief Ministerial Candidate For Delhi Assembly Elections

दिल्ली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची माळ डॉ. हर्षवर्धन यांच्या गळ्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. डॉ. हर्षवर्धन हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली आहे.

दिल्लीतील भाजपचा चेहरा म्हणून विजय गोयल यांना ओळखले जाते मात्र, नरेंद्र मोदींचे पारडे येथेही जड ठरलेले दिसत आहे. गोयल यांचे डॉ. हर्षवर्धन यांना मोठे आव्हान होते मात्र संसदीय बोर्डाच्या आज (बुधवार)झालेल्या बैठकीनंतर डॉ. हर्षवर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, विजय गोयल उपस्थित होते.

डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजनाथ सिंह यांनी दिल्लीत भाजपच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. नुकत्याच आलेल्या एक सर्व्हेक्षणानुसार दिल्लीमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविणार असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे निवडणूकीआधीच एकाच नेत्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवून पक्षाला विजयी करण्याची भाजपची रणनिती आहे.