आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्ली मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आम आदमी पक्षही (आप) कामला लागला आहे. डॉ. हर्षवर्धन कृष्णा नगर येथून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी 'आप' प्रसिद्ध कवी आणि पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. डॉ. हर्षवर्धन कृष्णा नगर मतदारसंघातून चार वेळा विधानसभेत गेले आहेत.
हर्षवर्धन यांच्या निवडीवर उलट-सुलट प्रतिक्रीया देखील येत आहेत. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली भाजपला उपरोधीकपणे डॉ. मनमोहनसिंग करार दिला आहे. तर काँग्रेसने, डॉ. हर्षवर्धन यांचे आमच्या समोर कोणतेही आव्हान नसल्याचे म्हटेल आहे. या उलट भाजपकडून डॉ. हर्षवर्धन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाचे नेते विजय मल्होत्रा यांनी त्यांना शक्तीशाली नेते असल्याचे म्हटले आहे तर, विजय गोयल यांनी अद्याप काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.