आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harssment Case: AAP Minister Somnath Bharti Get Clean Chit From Party

छेडछाडीचे प्रकरण:‘आप’चे मंत्री सोमनाथ भारतीला पक्षाने दिली क्लीन चिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युगांडाच्या महिलेने केलेल्या छेडछाडीच्या तक्रारीवरून अडचणीत आलेले दिल्लीतील ‘आप’ सरकारचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना पक्षाने मात्र क्लीन चिट दिली आहे. गुरुवारी एका बैठकीत न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट पाहून नंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पक्षाने स्पष्ट केले. या काळात सोमनाथ यांनी माध्यमांपासून दूर राहावे व भडक वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही पक्षाने दिला आहे.
15 जानेवारीला रात्री विदेशी महिलांशी छेडछाड केल्याचा आरोप भारतींवर असून पोलिसांत तक्रार नोंद आहे. दिल्लीतील एका कोर्टाने याबाबत काय कारवाई केली, याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून मागवले असून यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
काँग्रेस आक्रमक
‘आप’ सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या काँग्रेसनेही या मुद्द्यावर केजरीवाल सरकारला घेरले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही भारती यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. याशिवाय ‘आप’चे नेते कॅप्टन गोपिनाथ आणि राहुल मेहरा यांनीही भारती यांच्या वागणुकीबद्दल तसेच त्यांच्या उद्धट भाषेबद्दल आक्षेप घेतला.