आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणातही मीटबॅन, महाराष्ट्राचा तर्क- मासे आपोआप मरतात म्हणून बंदी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे होणाऱ्या मांसबंदीची व्याप्ती वाढतच चालली आहे. शनिवारी हरियाणा सरकारने 11 ते 18 सप्टेंबरपर्यंत मांसबदी घातली आहे. याआधी शुक्रवारी छत्तीगड सरकारने आठ दिवसांची बंदी घातली. मात्र नंतर हा कालावधी कमी करत दोन दिवसांवर आणला. ज्या महाराष्ट्रातून या मांसबंदीला सुरुवात झाली तिथे आता जैन धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधानंतर जैनांचे भाईंदरमध्ये उपवास आंदोलन सुरु झाले आहे. दुसरीकडे या प्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने केलेला युक्तिवाद अजब होता. महाधिवक्ता अनिल सिंह म्हमाले, मटण आणि माशांत फरक आहे. पाण्यातून बाहेर काढताच मासे मरतात, त्यांना मारले जात नाही. कोर्टाने आपल्या कॉमेंटमध्ये म्हटले, मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. येथे अशी बंदी घातली जाऊ शकत नाही. या शहराचे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलाव लागले.

काय आहे प्रकरण

कोर्टाने विचारले - ‘मांसावर बंदी घातली, पण मासे,सी-फूड, फ्रोजन मटण आणि अंड्यांवर बंदी का घातली नाही, त्यांना मारले जात नाही का?’
त्यावर उत्तर- ‘मटण आणि माशांत फरक आहे. पाण्यातून बाहेर काढताच मासे मरतात, त्यांना कापून मारले जात नाही.’

कोर्टाने विचारले - ‘मटण विक्री कशी रोखणार? पोलिस, महापालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन तशी खात्री करून घेणार का?’
त्यावर उत्तर- ‘आम्ही लोकांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांना रोखणार नाही. बंदी फक्त कत्तल आणि विक्रीवर आहे. खाण्यावर नाही.’
कोर्टाने विचारले - एकीकडे अहिंसेच्या गोष्टी करता, पण कत्तल आणि मांसविक्रीवर काही दिवस बंदी व उर्वरित दिवस बंदी नाही, हे कसे? फक्त एक दिवसच अशी भावना मनात येते व दुसऱ्या दिवशी ती जाते, असे कसे?
न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारी वकील निरुत्तर. (संपूर्ण युक्तिवाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठे - कुठे बंदी

>>गुजरात - अहमदाबादचे पोलिस आयुक्त शिवानंद झा यांनी गुरुवारी एक आठवड्यासाठी गाय, बैल, बोकड, म्हैस यासारख्या प्राण्यांच्या मोकळ्या जागेतील कत्तलीला बंदी घातली आहे.

>>महाराष्ट्र - राज्यातील तीन महानगर पालिका क्षेत्रांमध्ये मांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात मुंबई, मीरा-भाईंदर आणि नाशिक महानगर पालिका यांच्या कार्यक्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत गुरुवार, शुक्रवारसह 17 आणि 20 सप्टेंबर यादिवशी बंदी लागू राहील. तर मीरा-भाईंदरमध्ये गुरुवारपासून आठ दिवसांसाठी मांसविक्री बंदी घालण्यात आली आहे.

>>राजस्थान - राजस्थान सरकारने गुरुवारी मांसविक्री बंदी घातली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार 17,18 आणि 27 सप्टेंबरपर्यंत मांसबंदी आहे.

>> जम्मू-काश्मीर - हायकोर्टाने जम्मू-काश्मीरमध्ये बीफ (गोमांस) बंदी घातली आहे. हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले आहेत की बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.

>> छत्तीसगड - सरकारने राज्यात नऊ दिवस मांस खरेदी-विक्री बंदी घातली. मात्र कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ती दोन दिवसांवर आणली आहे.