आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana MP Birender Singh Removed Congress Working Committee, News In Marathi

अमित शाह यांची भेट घेणारे खासदार बीरेंद्र सिंह यांची एआयसीसीमधून हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणारे खासदार बीरेन्द्र सिंह चौधरी यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीतून (एआयसीसी) हकालपट्टी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने खासदार सिंह यांना नोटिस बजावली आहे. अमित शाहा यांची भेटीमागील कारण स्पष्‍ट करण्यास सांगितले आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या विरोधात बंडाचा बिगुल वाजवणारे खासदार बीरेंद्र सिंह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने ही कारवाई केली आहे. बीरेंद्र सिंग यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावरून सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या सिंह यांना अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सदस्य बनवण्यात आले होते.

अखिर भारतीय कॉंग्रेस कमिटीचे (एआयसीसी) महासचिव आणि हरियाणाचे प्रभारी शकील अहमद यांनी बीरेंद्र सिंह यांना अमित शाह यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीरेंद्र सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु याबाबत सिंह यांनी आपली प्रतिक्रियाही दिलेली नाही. त्यामुळे यवरून स्पष्ट होते की, बीरेंद्र सिंह यांची भाजपशी जवळीकता वाढत आहे.

दुसरीकडे, येत्या 18 ऑगस्ट रोजी कॅथलमध्ये भाजपच्या रॅलीत खासदार बीरेंद्र सिंह सहभागी होणार आहेत. या रॅलीत अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

(फाईल फोटो : खासदार बीरेंद्र सिंह)