आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगगुरू बाबा रामदेवांनीच केली आपल्या गुरुची हत्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- योगगुरु बाबा रामदेव पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. रामदेव यांनी त्यांचे गुरु शंकरदेव यांचे तुकडे- तुकडे करून त्यांना गंगा नदीत फेकून दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचे नाव राकेश असून बाबा रामदेवांनी त्याचा डोळ्यादेखत शंकरदेव यांना मारण्याचा डाव आखल्याचाही दावा त्याने केला आहे.

रामदेवांचे गुरु शंकरदेव हे हरिद्वारच्या आश्रमातून अचानक गायब झाले होते. त्यांची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक वेळा रामदेवांवर संशय व्यक्तही केला होता होता. परंतु पुराव्या अभावी उत्तराखंड पोलिस अद्यापही ठोस पाऊल उचलू शकलेले नाहीत. परंतु, राकेश नामक एक व्यक्ती 'यू ट्यूब'वर आपला एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्याने बाबा रामदेवांबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. रामदेवांचे गुरु शंकरदेव यांची हत्या ही बाबा रामदेवांनीच केली आहे. त्यांनी शंकरदेव यांचे तुकडे- तुकडे करून गंगा नदीत फेकून दिले आहेत, असाही दावा राकेश याने केला आहे. गुरु शंकरदेव यांचा काटा काढण्याची योजना रामदेव यांनी त्याच्यासमोरच केल्याचेही राकेश याने सांगितले आहे.