आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Has Three Reasons Nawaz Sharif Arrived In India Today Announced

सरबजीतसिंगच्या कुटुंबियांनी विचारले, काय आता शरीफ झालेत, नवाज शरीफ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभास उपस्थित राहाण्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र. त्यासोबतच पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष पीएमएल - एनचे नेते शीरी रहमान यांनी स्पष्ट केले आहे, की भारताला पाकिस्तानसोबत प्रत्येक मुद्यावर बातचीत करावी लागले. तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केले, की नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर लगेच सर्वच मुद्यावर बातचीत होणार नाही, मात्र, चर्चेला सुरवात होऊ शकते.

दुसरीकडे, आता नवाज शरीफ यांच्या भारत दौ-याला विरोध सुरु झाला आहे. सरबजीतसिंग यांच्या कुटुंबियांनी शपथविधी सोहळ्यात शरीफ यांच्या उपस्थितीला विरोध केला आहे. सरबजितसिंग यांची बहिण दलबीर कौर म्हणाल्या, 'नवाज शरीफ आता शरीफ झाले आहेत का? की ते, रहेमान मलिक सारखेच आहेत. ज्यांना आम्ही शैतान मलिक म्हणत होते. प्रत्येक भारतीयाने नवाज शरीफ यांच्या भारत दौ-याचा आणि शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहाण्याच विरोध केला पाहिजे.'
शुक्रवारी पाकिस्तानच्या प्रसारण मंत्र्यांनी पाकिस्तानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की भारताच्या नवीन पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाण्याचा निर्णय शरीफ शेवटच्या क्षणाला घेणार आहेत. सोमवारी ते यासंबंधीची घोषणा करतील. मात्र, शनिवारीच शरीफ भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे, करण्यामागे दोन कारणे आहेत.
1- हेरात (अफगाणिस्तान) मध्ये भारतीय दुतावासावर हल्ला झाला. मोदींच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी अफगाणच्या राष्ट्रपतींनी निमंत्रीत केले गेले, त्यानंतर हा हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचाही सहभाग असल्याचे बोलले जाते.
दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तान बदनाम असताना भारताने शरीफ यांना निमंत्रण पाठवून एक सकारात्मक पाऊल टाकले.
हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले, 'या हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, की अफगाणिस्थानच्या शांतता, स्थिरता आणि सुरक्षेला सीमेवर सुरु असलेल्या दहशतवादी घटनांचा धोका आहे.' अशा परिस्थितीत पाकिस्तानने भारताचे निमंत्रण स्विकारले नसते तर चुकीचा संदेश गेला असता आणि आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते.
2 - भारताच्या निमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एवढा वेळ घेतल्यामुळे अनेक चुकीचे संदेश पसरत होते. भारतीय माध्यमांमध्ये पाक लष्कराकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत शरीफ होकार दर्शवणार नाही, असे वृत्त प्रसारित होत होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारची प्रतिमा ही लष्कराच्या इशा-यावर चालणारे सरकार अशी व्हायला नको म्हणून लवकर निर्णय घेतला गेला.
3 - पाकिस्तानमधील एक मोठा समुह शरीफ यांच्या भारत दौ-याच्या विरोधात होता. यात त्यांचे काही सहकारी देखील होते. त्यांचे म्हणणे होते, की शरीफ भारतात काय फक्त छायाचित्र काढण्यासाठी जात आहेत. त्यामुळे शरीफ यांना भारताकडून आश्वासन हवे होते, की शपथविधीनंतर नव्या पंतप्रधानांसोबत त्यांची भेट आणि विविध विषयांवर चर्चा होईल. त्यानंतरच त्यांना निर्णय घेणे सोपे जाईल. 27 मे रोजी शरीफ आणि मोदी यांची भेट होणार आहे. या भेटीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काँग्रेसने मागणी केली आहे, की या भेटीत कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा नको.

शरीफ यांच्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी
1 - कारगिल युद्धानंतर शरीफ प्रथमच भारत दौ-यावर येत आहेत.
2 - कारगिल युद्धाआधी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बस घेऊन लाहोरला गेले होते. तेव्हा देखील शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
3 - दोन्ही देशांमध्ये सौहार्द निर्माण करणा-या या घटनेनंतर काही दिवसांनीच कारगिल युद्ध झाले होते.