आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hasiba B Amin Congress Ad Under Attack On Twitter

काँग्रेसचा नवा चेहरा हसीबाने दिला इशारा, \'मला बदनाम करणारे मर्यादा ओलांडत आहेत\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या जाहिरातींमधून झळकलेला नवा चेहरा हसीबा बी. अमीन सध्या वादाच्या भोव-यात अडकली असून, रोज वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर आणि यूट्यूबवर तिच्या विरोधात सुरु असलेल्या अभियानावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. हसीबा अमीनचे म्हणणे आहे, 'त्या लोकांनी (आरोप करणारे) मर्यादा ओलांडली आहे.' हसीबा अमीनने 300 कोटींचा घोटाळा केल्याचा आणि या आरोपात तुरुंगवास भोगल्याचाही तिच्यावर आरोप होत आहे. या आरोपांमुळे काँग्रेसची ही नवी जाहिरातही वादात अडकण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या एका जाहिरातीत त्यांनी मोदींची घोषणा चोरल्याचा आरोप झाला होता.
कोण आहे हसीबा अमीन ?
काँग्रेसने सध्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर जोर दिला आहे. या जाहिरातीतून नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. यात हसीबा अमीन, 'कट्टर विचार नाही, युवा जोश' चा नारा देताना दिसते. ती गोवा एनएसयुआयची अध्यक्ष आहे.
ती म्हणते, जेव्हा मला कळाले की, काँग्रेसच्या प्रचार अभियानात माझाही सहभाग राहाणार आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत इतर नेत्यांसोबत मी टीव्हीवर झळकणार आहे, तेव्हा मला अतिशय आनंद झाला होता. मात्र, ही जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून इंटरनेटवर हसीबाची आणि जाहिरातीची खिल्ली उडवली जात आहे. अशा खालच्या दर्जाच्या टीकेमुळे माझ्यावर परिणाम होणार नसल्याचे, तिने म्हटले आहे. 300 कोटींचा घोटाळा आणि तुरुंगवास झाला का, असे तिला विचारले असता, 'अशा लोकांची किव करावी वाटते' असे ती म्हणाली.

पुढील स्लाइडमध्ये, कोणते आरोप आहेत हसीबा अमीनवर