आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Having New Friends For The Defeating Congress Lalkrishna Advani

काँग्रेसला हरवण्यासाठी हवेत नवे मित्र- लालकष्‍ण अडवाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसला हरवण्यासाठी भाजपला नव्या मित्रांची गरज आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत पक्षाने नवे मित्र जोडावेत, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाला दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून जदयू वेगळे झाल्यानंतर अडवाणींनी प्रथमच जाहीरपणे मतप्रदर्शन केले आहे.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अडवाणी बोलत होते. अडवाणी म्हणाले की, ‘शामाप्रसाद मुखर्जी यांनी 1952 मध्ये म्हटले होते की काँग्रेसला हरवण्यासाठी दुस-या पक्षांचे सहकार्य घेतले जाऊ शकते, असे म्हटले होते. त्यांचे ते विचार आजही लागू पडतात, असे अडवाणी म्हणाले.