आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस फेरीवाल्यांना सशक्त करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-संसदेत फेरीवाल्यांशी संबंधित विधेयक मंजूर झाल्याच्या दुसर्‍या दिवशी फेरीवाल्यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. विधेयक मंजूर झाल्याबद्दल मी फेरीवाल्यांचे अभिनंदन करतो. यापुढे त्यांना विनाअडथळा व्यवसाय करता येऊ शकेल. 70 कोटी लोक हा देश चालवतात, त्यामुळे त्यांचा लढा हा आमचा लढा आहे. या 70 कोटी लोकांमध्ये फेरीवाल्यांचाही समावेश आहे, असे राहुल यांनी सांगितले. मंगळवारी फेरीवाल्यांना सुरक्षा पुरवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या माध्यमातून फेरीवाल्यांना होणार्‍या त्रासाला अटकाव केला जाईल.