आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HC Notice To Punjab On Z Security To Ashutosh Maharaj

सात महीने आशुतोष महाराजांच्या \'देहाला\' Z सुरक्षा देण्याबाबत हाईकोर्टाचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : आशुतोष महाराज

नवी दिल्ली - जालंधरचे दिव्य ज्योती जागृती संस्थान नूरमहलचे प्रमुख आशुतोष महाराज यांच्या देहाला प्रदान करण्यात आलेली झेड सेक्युरिटी मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीनंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आशुतोष मोहंता आणि जस्टीस एचएस सिद्धू यांच्या पीठाने पंजाबचे मुख्य सचिव, डीजीपी आणि मुख्य गृहसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पंजाब सरकारने या प्रकरणी हायकोर्टात स्टेट्स रिपोर्ट दाखल करून सांगतिले होते की, 28 जानेवारी 2014 च्या रात्री सव्वा दोन वाजता सतगुरु प्रताप सिंह अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशुतोष महाराज क्लिनिकली डेड असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याठिकाणी सीआरपीएफ आणि पंजाब पोलिसांचे जवान तैनात आहेत. येथे आशुतोष महाराजांचा देह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला आहे. महाराज मृत नसून समाधीस्थ असल्याचे त्यांच्या अनुयायांचे म्हणणे आहे.

एकिकडे मृतदेहाला झेड सुरक्षा देण्यात आली आहे आणि दुसरीकडे सुरक्षा रक्षकांच्या कमतरते अभावी सामान्य नागरिक असुरक्षित असल्याचे याचिका दाखल करणा-या दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे की, आशुतोष महाराजांच्या मृतदेहाची सुरक्षा काढून घेण्याची मागणी करणारे एक पत्र 17 जुलैला सरकारला देण्यात आले होते. पण त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा आशुतोष महाराज यांचे काही फोटो...