आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल, जेठमलानी पेमेंटच्या वादावर सुनावणीस दिल्ली हायकोर्टाचा नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांना करण्यात येणाऱ्या पेमेंटच्या वादावर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. या प्रकरणी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे एक जनहित याचिका यापूर्वीच टाकण्यात आली आहे. त्यामुळे, ही याचिका कोर्टाचा वेळ वाया घालवणारी आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
 
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यामध्ये जेठमलानी केजरीवालांची बाजू घेत आहेत. दिल्ली सरकारने जेठमलानी यांना 1.22 कोटी रुपयांची फी देऊ नये यासाठी हायकोर्टाने आदेश काढावे अशी मागणी एका याचिकाकर्त्याने केली होती. त्यावर दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायाधीश अनु मल्होत्रा यांनी सुनावणीला नकार दिला. भारतीय जनता पक्षातून काढण्यात आलेले राम जेठमलानी मुख्यमंत्री केजरीवाल आणि इतर आप नेत्यांची कोर्टात बाजू घेत आहेत. त्यासाठी जेठमलानी यांनी केजरीवालांपुढे 10 कोटी रुपयांचे बिल पुढे केले. यापैकी अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धच्या मानहानी खटल्याची फी 1.22 कोटी रुपये असून ती दिल्ली सरकारकडून वसूल केली जाणार आहे. दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या प्रशासनाला जेठमलानी यांचे बिल पास करण्याचे आदेश दिले. त्याच प्रकरणात ही याचिका दाखल करण्यात आली होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...